Categories: Editor Choice

पिंपळेगुरवमध्ये जल्लोषात रंगली दिवाळी पहाट; नागरिकांची प्रचंड गर्दी, तरूणाई आणि महिलांनी धरला ठेका

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑक्टोबर) : आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील हिरवळीवर रविवारी (दि. २३) दिवाळी पहाट रंगली. बासरी-व्हायोलिन-तबला कलाकारांची जुगलबंदी आणि अवीट गोडीच्या गाण्यांच्या फराळाचा नवी सांगवी- पिंपळेगुरवमधील रसिकांनी भल्या पहाटे आनंद लुटला. श्रीगणेशाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, विठ्ठलाचे भक्ती गीत, लावणी अशा नवीन जुन्या अनेक गाण्यांवर तरूणाईने ठेका धरला. त्यामुळे मोठ्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. विशेषतः महिलांमध्ये अधिक  नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.

दिवाळीतील पहिल्याच दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी व प्रतिभा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, संतोष कांबळे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेविका ममता गायकवाड, माधवी राजापुरे, वैशाली जवळकर, श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, नवनाथ जांभुळकर, सखाराम रेडेकर, रमेश काशिद, गोपी पवार, उमेश बोरसे, राहुल जवळकर, शिवाजी निम्हण, शिवाजी कदम, सुरेश तावरे, पोपट जगताप, शशिकांत दुधारे, गणेश गावडे, डॉ. ननवरे, ज्ञानेश्वर खैरे, राजेंद्र येडे, साई कोंढरे भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, कावेरी जगताप, पल्लवी जगताप, उर्मिला देवकर, विजया देवकर, शोभा जांभुळकर, कोमल गोंडाळकर आदी उपस्थित होते.

उद्यानाच्या हिरवळीवर रसिकांची गर्दी, दिव्यांचा लखलखाट, आकाश कंदिलाची सजावट आणि दुसरीकडे सुरेल गीतांनी दिवाळीची पहिली पहाट पिंपळेगुरवकरांच्या ह्दयात घर करून गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, संज्योती जगदाळे, स्वप्ना काळे, राजू जाधव यांनी भक्तीगीते, भावगीतांसह अनेक मराठी आणि हिंदीतील सुरेल व मधुर गाणी सादर केली. या गाण्यांच्या सुरांनी पिंपळेगुरवचे रसिक मंत्रमुग्ध झाले. अनेक गाण्यांवर तरूणाई थिरकली. हा जल्लोष पाहून मोठ्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. विशेषत: महिलांनी धरलेल्या जल्लोषपूर्ण ठेक्याने दिवाळी पहाट रंगतदार बनली. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

12 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago