Google Ad
Uncategorized

अयोध्येतील अक्षता कलश आज सांगवीत : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेला पवित्र अक्षतांचा कलश दर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०१ डिसेंबर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामार्फत निर्माण होत असलेल्या मंदिरात पौष शुद्ध द्वादशीला, म्हणजे दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशविदेशातील प्रमुख पंथांचे धर्माचार्य आणि देशातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अयोध्या येथे अभिमंत्रित केलेल्या अक्षता ठेवलेले कलश सर्व राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहेत. या अक्षतांचा एक कलश सांगावी येथील श्री गजानन महाराज मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. या कलशाच्या दर्शनाचा लाभ भक्तांनी दि. 1 डिसेंबर ला घ्यावा, असे आवाहन श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियान यांच्या वतीने करण्यात आले आहेत.

Google Ad

* श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियान *

* श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेला पवित्र अक्षतांचा कलश मोरया गोसावी मंदीर चिंचवड या ठिकाणी आहे.

*१ डिसेंबर, वार शुक्रवार सकाळी* या मंगल कलशाचे आगमन

आपल्या सांगवी मध्ये होणार आहे. हा मंगल कलशाचे आपण एकत्रितरित्या स्वागत करून हा मंगल कलश *श्री गजानन महाराज मंदीरात* येणार आहे..

स्वागतासाठी एकत्रित येण्याचे ठिकाण * सकाळी ८;१५ वा*

* श्रीराम मंदीर जुनी सांगवी*

तरी या अलौकिक सोहळ्यासाठी आपण बहुसंख्येने यावे ही नम्र विनंती.

(मंगल कलश दिवसभर गजानन मंदिरात दर्शनासाठी ठेवला जाईल)

* श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियान*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!