Google Ad
Uncategorized

श्री गणेश सहकरी बँक चेअरमन पदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड झाल्याबदल पिंपरी चिंचवडकरांकडून अभिनंदन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील एक अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या  श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी शंकर जगताप यांची तर उपाध्यक्ष पदी संतोष देवकर यांची संचालक मंडळाच्या वतीने एकमताने आज (दि.३० नोव्हेंबर रोजी) निवड करण्यात आली.

श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक – संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत.आगामी काळात सहकार क्षेत्र हे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळेच लोकनेते लक्ष्मणभाऊ जगतापनानासाहेब शितोळे, दत्तात्रय उर्फ रावसाहेब चौगुले, राजेंद्र राजापूरे आणि उद्धव पटेल यांच्या पुढाकाराने सन १९९८ साली बँकेची स्थापना केली. लोकनेते लक्ष्मणभाऊ यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे तसेच बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवाआकर्षक कर्ज योजनाठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.

Google Ad

श्री गणेश सहकारी बँक मर्यादित या बँकेची पंचवार्षिक निवडणुकीत सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून (सन २०२३-२०२८) आले.  या निवडलेल्या संचालक मंडळातून बँकेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडले जाणार होते यात सर्वानाच उत्सुकता होती. ती शंकर जगताप यांची निवडीचे पूर्ण झाली, शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या  पावलावर पाऊल टाकत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले होते, या बद्दल खातेदार, सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे…

अध्यक्ष : शंकर पांडुरंग जगताप
उपाध्यक्ष : संतोष सखाराम देवकर

संचालक सदस्य –
संजय गणपत जगताप
सुरेश शंकर तावरे
दत्तात्रय गोविंद चौगुले
शशिकांत गणपत कदम
राजेंद्र शंकर राजापुरे
उद्धव मुरार पटेल
अंकुश रामचंद्र जवळकर, शिवलिंग बसवंतप्पा किंणगे
मधुकर सोपान रणपिसे
सुरेश तात्याबा शिंदे
शहाजी भगवानराव पाटील
अभय केशव नरडवेकर
प्रमोद नाना ठाकर
सौ. राजश्री बिभीषण जाधव
सौ. शैला जनार्दन जगताप

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या माध्यमातून श्री गणेश सहकारी बँक आजही आपली नियमित प्रगती करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक कटिबद्ध आहोत.

शंकर पांडुरंग जगताप, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!