Categories: Editor Choiceindia

१ ऑक्टोबरपासून आपल्या सर्वांच्या आयुष्यात होणार …. हे नवे बदल!

महाराष्ट्र 14 न्यूज : १ ऑक्टोबरपासून आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही नवे बदल होणार आहेत. या नव्या महिन्यात सणांची सुरुवात होतेय. दरम्यान सरकारतर्फे अनलॉक ५ ची घोषणा होईल. हवाई मार्ग, मिठाई, गॅस सिलेंडर, आरोग्य विमा सहीत अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारेय. त्यामुळे याची माहिती असणं गरजेचं आहे.

गॅस सिलेंडर किंमत ;-
तेल मार्केटींग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या नव्या किमतींची घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये यामध्ये काही चढ उतार पहायला मिळाले. १ ऑक्टोबरपासून एलपीजी किंमती वाढ किंवा घट होऊ शकते. याच्या मानसिक आणि आर्थिक परिणामासाठी तुम्ही तयार रहायला हवं.

मिठाईचे नियम :-
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा ‘आधीची बेस्ट तारीख’ जाहीर करणे अनिवार्य केले आहे. ऑक्टोबर १ पासून आदेश अमलात आणला जाईल. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर ‘तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट’ असं नमूद करणे आवश्यक असेल. दुकानदारांना आता मिठाईचा कालावधी पूर्ण होण्याच्या तारखेपूर्वी विकाव्या लागतील.

ड्रायव्हींग लायसन्स :-
केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि ई चलान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही. ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.

गाडी चालवताना :-
गाडी चालवताना रुट नेविगेशनसाठी मोबाईलचा वापर होतो. पण हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की गाडी चालवताना कोणता अडथळा येऊ नये. अन्यथा १ हजार ते ५ हजारपर्यंत दंड होऊ शकतो. रस्ते परिवहन मंडळाने यासंदर्भात माहिती दिली.

आरोग्य विमा ;-
आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. या पॉलिसींमध्ये १ ऑक्टोबरपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. यामुळे हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे नियम स्टॅंडराइज आणि ग्राहक केंद्रीत होणार आहेत. यात इतर काही बदल देखील आहेत.

परदेशात पैसे पाठवण महाग :-
केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावरील टॅक्स संदर्भात नियम जोडलाय. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. तुम्ही विदेशात शिकताय किंवा तुमच्या मुलाला पैसै पाठवताय किंवा विदेशातील तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करताय तर तुम्हाला ५ टक्के अधिक टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCT) भरावा लागणार आहे. रिझर्व बॅंकेच्या लिबरलाइज रेमिटेंस स्किम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींना टीसीएस द्यावे लागणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago