Google Ad
Uncategorized

‘जागो ग्राहक जागो’ ! तुम्ही खरेदी करत असलेले ब्राडेड साहित्य डुप्लिकेट तर नाही?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ ऑगस्ट) : नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि मोबाईल पार्टची विक्री आणि खरेदी होत असते. या बाजारात मोठ्या प्रमाणात अॅप्पल कंपनीचे इयर बर्ड आणि इतर साहित्य बनावट (Duplicate) विकले जात असल्याच्या तक्रारी एप्पल कंपनीकडे आल्या. त्यावरून अॅप्पल कंपनीने याची माहिती पोलिसांना दिली.

अॅप्पल कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी सीताबर्डीतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धाड टाकली. चार दुकानांमध्ये तपासणी केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इअर बर्ड आणि इतर साहित्य बनावट असलेले अॅप्पलच्या नावाने विकल्या जात होते. त्यावरून पोलिसांनी कारवाई करत 87 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. अशी माहिती सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी दिली.

Google Ad

अॅप्पल कंपनीचे साहित्य ब्रान्डेड असते. त्यामुळे त्याची किंमतीही जास्त असते. डुप्लिकेट अॅप्पल कंपनीचे साहित्य तयार करून ते विकले जात होते. ही बाब लक्षात आली. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर अॅप्पल कंपनीने पोलिंसात तक्रार केली. पोलिसांच्या मदतीने इलेक्ट्रिक मार्केटमध्ये धाड टाकली तेव्हा हा प्रकार समोर आला.

राज्यात तसेच देशात असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांनी कोणतीही वस्तू घेताना त्याचा ब्रँड नाव कंपनी याची खातरजमा केल्याशिवाय ती घेऊ नये, तसेच फसव्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन ‘दिनकर आमकर’ राष्ट्रीय अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!