Google Ad
Uncategorized

पुण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत आज दि.26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.”माझे संविधान,माझा अभिमान ” या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला,निबंध,वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रशालेचे प्राचार्य राजू दीक्षित, पर्यवेक्षिका भारती पवार ,कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी.तसेच जेष्ठ शिक्षिका शेळके एच.एस,चव्हाण पी.ई.,पतसंस्था संचालक अशोक गोसावी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रर्यवेक्षिका भारती पवार यांनी केले.”संविधान आदरणीय आहे,संविधानामुळे आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, आजपासून सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबासमवेत समानतेच्या नात्याने वागू ” असा बहुमोल संदेश प्राचार्य राजू दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतात दिला. जेष्ठ शिक्षिका शेळके एच.एस. सुधाकर कांबळे,बिपीन बनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Google Ad

*जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी.यांनी प्रशालेस “भारतीय संविधानाच्या” तीन प्रती प्रशाळलेस सप्रेम भेट दिल्या. कांचन घुले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!