‘इंडिया सायकल्स 4 चेंज’ सायक्लोथॉन व वॉकेथॉन कार्यक्रमाचे महापौर माई ढोरे यांनी केले उद्धाटन

महाराष्ट्र 14 न्यूज : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील नागरीकांनी आरोग्य राखण्यासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या ( MOHUA ) ” इंडीया सायकल्स 4 चेंज ” या उपक्रमांतर्गत सायक्लोथॉन व वॉकेथॉन कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या .

या प्रसंगी उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , आयुक्त श्रावण हार्डीकर , नगरसदस्या अनुराधा गोरखे , सह शहर अभियंता श्रीकांत सवणे , मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण , सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर , अण्णा बोदडे , कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे , सतिश इंगळे , बापु गायकवाड आणि विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते . आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले कोविड १ ९ च्या पार्श्वभुमीवर शहरात सर्व वाहतुक व्यवस्था लॉकडाऊनमुळे बंद पडली आणि अनलॉकच्या पार्श्वभुमीवर सायकलींग व पायी चालणे या व्यवस्थेला सर्वत्र महत्व प्राप्त होत आहे .

प्रत्येक रस्त्यावर सायकल पथ व पदपथ यांची निर्मिती करणे हे ध्येय प्रत्येक शहरासाठी ठेवण्यात येत आहे .त्यानुसार आपली महानगरपालिका देखील इंडीया सायकल फॉर चेंज या उपक्रमांतर्गत संपुर्ण शहरात सायकलीस्टसाठी सुरळीत असे वातावरण आणि रस्ते निर्माण करण्याचे ध्येय ठेवत आहे असे सांगुन नागरीकांनी दररोज कराव्या लागणा – या नजीकच्या प्रवासासाठी सायकल चालवायचा निर्धार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त करावा असे सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago