Google Ad
Uncategorized

भाजपच्या बालेकिल्ल्यात नागरिक वाऱ्यावर … ‘नखाते वस्ती, सिंहगड कॉलनीत’ नाल्याचे काम अर्धवट सोडून मनपा ठेकेदार फरार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहर आता स्मार्ट सिटी कडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे नागरिकांचे राहणीमान सुध्दा उंचावले आहे. शहरातील रस्ते फुटपाथ स्मार्ट झाले. परंतु शहरात असणाऱ्या राहटणी भागातील नखाते वस्तीतील नागरिक अजून या गोष्टींची वाट पाहत आहेत. आता तर सर्व पक्ष एकत्र आल्याने नागरिकांची कामे लवकर होणार या भोळ्या आशेवर नागरिक कामाची वाट पहात आहेत.

या भागातील 2022 रोजी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रहाटणी नखाते वस्ती सिंहगड कॉलनी मध्ये 2022 रोजी नोव्हेंबर डिसेंबर च्या कालावधीत या भागामधून जाणारा मोठा नाला दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विजय पवार ठेकेदार यांना काम दिले, त्यांनी ते काम सुरू ही केले. स्लॅब व नाला तोडण्यात आला, आतील नाल्याच्या आतील बाजू सिमेंट प्लास्टर करण्यात आले.

Google Ad

पण त्याच्यानंतर मागील 10 महिन्यापासून
नाल्यावरील स्लॅप अद्यापही टाकण्यात आलेला नाही, अधिकारी येतात आणि जातात, या ठिकाणी पाहणी केली असता काम पूर्णपणे बंद आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदार यांना अनेक वेळा कॉल केला, येतो – करतो असे बोलत उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्याचे दिवस आहेत, नागरिकांच्या दारामध्ये लहान मुलं खेळतात पावसाळा चालू असल्यामुळे नाल्यात पडून लहान मुलं वाहून जाण्याची एखादी घटनाही घडू शकते, तसेच पाऊस थांबला की घाण गटरामध्ये थांबली जाते, त्या वासाचा त्रास व त्यामुळे मच्छर होतात, मग डेंगू मलेरिया यासारख्या आजाराला रोगाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

त्यातच आता डोळ्याच्या साथीने डोके वर काढले आहे, याही आजाराचा नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुलं खेळताना गटारात पडू शकतात रात्रीचा या ठिकाणी  लाईटचे खांब होते, ते सुद्धा ठेकेदाराने सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाच्या वेळी तोडून टाकले असल्याचे नागरिक सांगतात, ते अद्यापही परत नवीन बसवण्यात आले नाहीत. अनेक वेळा ठेकेदार व स्थापत्य विभाग यांना तक्रार करून देखील काम होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. झोपडपट्टी तरी बरी अशी आमची अवस्था झाल्याचे नागरिक सांगत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तरी इच्छुकांचे लक्ष जाईल व आपले काम होईल ही अपेक्षा बाळगून काही नागरिक आहेत , तर काही नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

त्यामुळे महानगरपालिका स्थापत्य विभागाचे अधिकारी आणि आता असलेले प्रशासकीय राज याच्या कचाट्यात नागरिक सापडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मनपाने आमचे नाला बंद करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत हीच माफक अपेक्षा नखाते वस्ती सिंहगड कॉलनी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!