Alandi : आळंदी देवाची येथील काळे कॉलनीत नगरपरिषदेने उघड्यावरच सोडले मैला मिश्रीत पाणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : आळंदी देवाची येथील काळे काँलनीत गेल्या दोन वर्षापासून उघडयावर मैला मिश्रित पाणी सोडले जात आहे. सन 2018 मध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने नगराध्यक्षा सौ वैजंताताई उमरगेकर व तत्कालीन मुख्यधिकारी समीर भुमकर याना निवेदन देऊन खाजगी मालमत्तेतुन गटारीस विरोध करून काम थांबवण्यात आले.परंतु अजून ही उघडयावरून मैला मिश्रित पाणी पाण्याचा पाटाप्रमाणे वाहत जात असुन स्थानिक नागरिकांच्या भिंती ओल्या झाल्या आहेत. त्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. हि गटार लाईन प्रकाश काळे यांच्या खाजगी जागेत सोडली आहे. मैला मिश्रीत पाणी उघडयावरुन झुळझुळ वाहत आहे.

बाजूला दोन तीन सोसायटीचे पण अंदाजे 400 फ्लॅट चे काम चालू आहे .त्याचे ही मैला मिश्रीत पाणी पुढील काळात यामध्ये येउ शकते. नागरीकांना रहाणे कठीण झाले आहे. शिवाय बाजूला किड पँराडाईस ही शाळा आहे, त्यामुळे तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन वर्षापासून नगरपरिषदेचा कोणताही आधिकारी गांभीर्याने विषय घेत नाही.

यावेळी स्थानिक नागरिक  सदाशिव जाधव प्रकाश काळे,संगिता जोगदंड यांनी ही निवेदन दिले आहे.यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आळंदी शहर सचिव रवी भेंनकी, भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळे उपस्थित होते नगरपरिषदेच्या वतीने सचिन गायकवाड यांनी पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजंताताई उमरगेकर यांनी त्त्वरीत काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे जोगदंड यांनी सांगितलेयावेळी सा.का अशोक कांबळे म्हणाले की मी नगरपरिषदेत पाठपुरावा करतो.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

22 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago