Google Ad
Education Entertainment

स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षा निमित्त सांगवी प्रभागात भव्य तिरंगा_रॅली … नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सांगवी ग्रामस्थांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 1३ ऑगस्ट,) : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आपल्या घरी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. त्यानिमित्त शनिवार १३ ऑगस्ट रोजी सांगवीत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सांगवी परिसरातील नागरिक यांनी सांगवी परिसरात  तिरंगा रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी, यासाठी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची जनजागृती करण्याकरीता सांगवीत माजी महापौर माई ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे तसेच दिलीप तनपुरे, आप्पा ठाकर, कृष्णा भंडलकर, सोनम गोसावी, नृसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला जाधव यांनी हवेत कबुतरे उडवून रॅलीला प्रारंभ केला, यावेळी नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व सांगवी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.

Google Ad

ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी रॅलीमध्ये सहभागी होत देशभक्तीपर घोषणा दिल्या, तसेच शालेय विद्यार्थ्यांनी पदयात्रेद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरांवर अभिमानाने तिरंगा उभारून हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा.

सांगवीतील नागरिक हजारोच्या संख्येने रॅलीत सहभागी झालेल्या जनसमुहाला पाहून सांगवीवासी अक्षरशः भारावून गेले. मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीवर ठिकठिकाणी नागरिक महिला, पुरूषांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

पहा👇🏻👇🏻 काही क्षणचित्रे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. सोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!