Google Ad
Uncategorized

सरकारी कर्मचाऱ्यांनो हेल्मेट घालूनच बाहेर पडा … कारण आता तुमच्यावर असणार यांची नजर, काय आहे निर्णय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : पुणे शहरात 1 जानेवारी 2019 पासून दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती.त्यानंतर वाहतूक पोलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर अधूनमधून कारवाई करतात. या हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीने शहरात हेल्मेटला विरोध केला. आंदोलने केली, मोर्चे काढले. तरीही पुणे पोलिस हेल्मेट कारवाईवर ठाम राहिले. आता हेल्मेटसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांनो हेल्मेट घालूनच घराबाहेर पडा, असा सल्ला देण्याची वेळ आली आहे.

पुणे शहरात हेल्मेट न घालणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. सरकारी निमसरकारी आणि महामंडळातील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केल्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पुणे आरटीओने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

Google Ad

पुण्याच्या वाहतूक पोलिसाने अनोखी शक्कल केली आहे. या पोलिसाने हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी श्वानालाही हेल्मेट घातलेय. वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकांना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घातले आहे. यासंदर्भात त्यांनी जनजागृती सुरू केलीय. त्यांच्या दुचाकीवर श्वानला बसवले असून त्याला हेल्मेट घातले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पुणे शहरात तीन पथके तयार केली आहे. ही पथके शहरात हेल्मेट न वापणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहे. याआधी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयात जात हेल्मेट वापरासाठीचे प्रबोधन करण्यात आले होते. हेल्मेटचा वापर न केल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेक चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर ही सक्ती करण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!