महाराष्ट्र 14 न्यूज : भारत सरकारच्या फेम -2 योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस उत्पादनात अग्रणी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPL)150 इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. EVEY ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करेल, पुढच्या 12 महिन्यांच्या कालावधीत त्या वितरीत केल्या जातील. कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल देखील कंपनीकडून केली जाईल.
150 बसेस पुरवठ्याच्या या नवीन आदेशासह, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL)ला आता एकूण 900 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करायचा आहे. “पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPL) ने 12 मीटर लांबीच्या 150 इलेक्ट्रिक बसची मागणी आमच्याकडे केली आहे ही आनंदाची बाब आहे. ओजीएल / EVEY ने पुण्यात याआधीच दिलेल्या 150 बसेस रस्त्यावर सेवा बजाबत आहेत आणि या नव्या ऑर्डरमुळे इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याचा आकार 300 पर्यंत जाईल जो देशातील सर्वाधिक आहेत. ओजीएल आणि ईव्हीवाय ट्रान्स या दोघांसाठीही हा अभिमानास्पद क्षण आहे, ”असे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे सीईओ आणि सीएफओ शरत चंद्र यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…