Categories: Editor Choice

पुणे महापालिकेने निवडणुकीसाठी सुरू केली तयारी …अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर ; जाणून घ्या नावे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : महापालिका निवडणुकांची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास दिली. त्यामुळे निवडणुका तूर्तास तीन ते चार महिन्यांसाठी लांबणीवर पडल्या असल्या, तरी महापालिका प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर, महापालिकेच्या निवडणूक विभागाने आता प्रत्येक प्रभागाकरिता स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला आहे.

पुणे महापालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीसाठी अनुसुचित जाती (SC) आणि अनुसुचित जमातीसाठी (ST) आरक्षित ५८ प्रभागांमधील आरक्षण बुधवारी (ता.18 मे) जाहीर करण्यात आले.

यामध्ये एकून 173 जागांपैकी अनुसुचित जाती प्रवर्गासाठी २३ आणि अनुसुचित जमातीसाठी प्रवर्गाच्या २ जागांचा समावेश आहे. त्यामुळे आता महिला आरक्षण  सोडतीकडे लक्ष लागले असून त्यानंतरच प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुणे पालिकेकडून बुधवारी रात्री उशीराने संकेतस्थळावर ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी प्रवर्गांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. इतर मागासवर्गाचे आरक्षण (OBC Reservation) न्यायालयाने रद्द ठरविल्यामुळे प्रशासनाकडून फक्त अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठीच्या प्रवर्गांचेच आरक्षण निश्चित केलेले आहे.

संबधित प्रभागातील 2011 च्या लोकसंख्येनुसार 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या निवडणूक आयोगाने गृहीत धरली असून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे आरक्षण निश्चित केले आले. आता ज्या प्रभागांमध्ये हे आरक्षण निश्चित झाले. त्यामध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतरच नक्की कोणती जागा महिला अनुसुचित जाती, जमातीसाठी आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र. २० – पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड
एकूण लोकसंख्या : ६७ हजार १२९ –
अनुसुचित जाती लोकसंख्या :१९ हजार ५६२
प्रभाग क्र. ५०- सहकारनगर – तळजाई
एकूण लोकसंख्या : ६१ हजार २४४
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ३२
प्रभाग क्र. ४८ – अप्पर सुप्पर-इंदिरानगर
एकूण लोकसंख्या : ५६ हजार ८८४
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार ६९१
प्रभाग क्र. ८ – कळस – फुलेनगर
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २७३
अनुसुचित जाती लोकसंख्या :१५ हजार ५८३
प्रभाग क्र. २७ – कासेवाडी लोहियानगर
एकूण लोकसंख्या : ६८ हजार ५९१
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ६९
प्रभाग क्र. ९ – येरवडा
एकूण लोकसंख्या : ७१ हजार ३९०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार १३९
प्रभाग क्र.११ – बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २६९
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ११५
प्रभाग क्र. ७ – कल्यानीनगर-नागपुरचाळ
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ७३९
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार १५४
प्रभाग क्र. ३७ – जनता वसाहत- दत्तवाडी
एकूण लोकसंख्या : ६९ हजार ६७२
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार २०९
प्रभाग क्र- ३८- शिवदर्शन -पद्मावती
एकूण लोकसंख्या : ६४ हजार २२१
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ४३
प्रभाग क्र. १ – धानोरी-विश्रांतवाडी
एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९२७
प्रभाग क्र. ४२ – रामटेकडी-सय्यदनगर
एकूण लोकसंख्या : ४९ हजार २५
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार ३७०
प्रभाग क्र. २६ – वानवडी गावठाण-वैदुवाडी
एकूण लोकसंख्या : ५९ हजार २०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९९३
प्रभाग क्र. २२ – मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८७८
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. १०- शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी
एकूण लोकसंख्या : ६२ हजार ४८१
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. ३९ – मार्केटयार्ड-महर्षीनगर
एकूण लोकसंख्या : ६० हजार ५३७
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ८५४
प्रभाग क्र. २१ – कोरेगाव पार्क – मुंढवा
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ५७४
अनुसुचित जाती लोकसंख्या ११ हजार ७६१
प्रभाग क्र.४७ कोंढवा बु.-येवलेवाडी
एकूण लोकसंख्या : ५४ हजार ४९२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार २०६
प्रभाग क्र. ४६ – मोहमंदवाडी-उरुळी देवाची
एकूण लोकसंख्या : ५२ हजार ७२०
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार २६
प्रभाग क्र.१९ – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९९४
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ७८५
प्रभाग क्र.- ४ – पुर्व खराडी- वाघोली-
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९१२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५६४
प्रभाग क्र- १२ – औंध-बालेवाडी
एकूण लोकसंख्या : ६३ हजार ३६२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ९९६
प्रभाग क्र. ३ – लोहगाव- विमाननगर –
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८३६
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५९२

अनुसुचित जमाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र.- १ – धानोरी- विश्रांतवाडी
एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६५२
प्रभाग क्र. १४ – पाषाण – बावधान बुद्रुक
एकूण लोकसंख्या : ५७ हजार ९९५
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६२८

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

15 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago