Mumbai : खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा – या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेला राज्य सरकारकडून हिरवा कंदिल

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर देखील बंधने आले आहेत. त्यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा अनेक सण लोकांना घरच्या घरीच साजरे करावे लागले. मे महिन्याची सुट्टीतही अनेकांना गावाला जाता आले नाही. अशा परिस्थितीत सर्व चाकरमानी निदान गणेशोत्सवासाठी जरी कोकणात जायला मिळेल याची वाट पाहत होते. मात्र रेल्वे बंद असल्यामुळे अनेकांना वाहनाने गावाला जावे लागत आहे. मात्र सर्वांनाच ते परवडण्यासारखे नसून ज्यांचे स्वत:चे वाहन नाही त्यांना गावी जाणे मुश्किल झाले होते. म्हणून विशेष रेल्वे गाड्या सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.

अशा परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे हे चित्र बदलले होते. मात्र लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आता या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडजण्यात येणार आहेत. एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता विशेष रेल्वेही कोकणासाठी धावतील.

राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आम्ही लवकरच माहिती देऊ, अशी माहिती लोकसत्ताशी बोलताना दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago