Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे यांचे ह्रदयविकाराने दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ५ फेब्रुवारी) :  पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय – ५२) यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे

आज सकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. लोकमान्य रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवड यांच्या अचानाक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सुरवातीला प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

13 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

13 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago