Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी चे नियमित वर्ग सोमवार पासून सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५फेब्रुवारी( : जगभरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉन ( Omicron ) आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटना ( W.H.O. ) ने सदर विषाणू प्रकारास Variant of Concern म्हणून जाहीर केले आहे . सदर विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाय योजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे . त्यामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या सुरू करण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत.

१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी चे नियमित वर्ग ( पूर्ण सत्र कालावधीत ) दिनांक ०७/०२/२०२२ पासून सुरु राहतील .

२ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोचिंग क्लासेस ( Coaching Classes ) , स्पर्धा परीक्षांचे क्लासेस हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने सुरु राहतील . मात्र सदर ठिकाणी कार्यरत असणारे प्रशिक्षक व कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा ( डोस ) पूर्ण झालेले असणे अनिवार्य राहील.

३ ) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड १ ९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० , तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील .

सदर आदेश दि . ०७.०२.२०२२ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असा आदेश पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांनी दि . ०५.०२.२०२२ रोजी दिलेला आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

7 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

12 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago