Google Ad
Uncategorized

पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्यांक करत ‘लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या फुल पिच डे-नाईट टेनिस बॉल ‘लोकनेते लक्ष्मणभाऊ चषक’ क्रिकेट स्पर्धेची … सांगवी येथील पीडब्लूडी मैदानात दिमाखात सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी ) : ‘लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या जयंती निमित्त फुल पिच टेनिस बॉल ‘लोकनेते लक्ष्मणभाऊ चषक २०२४’ या क्रिकेट स्पर्धाचे आयोजन पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष ‘शंकरभाऊ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज (दि.०८ फेब्रुवारी) पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे, शंकरभाऊ जगताप, तुषार हिंगे, मा. नगरसेविका माधवी राजापुरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला .

यावेळी माजी नगरसेवक संतोष कांबळे, राजेंद्र राजापुरे, हर्षल ढोरे, सागर अंगोळकर, महेश जगताप, संजय जगताप, दिलीप तनपुरे, सुभाष पवार, गणेश बनकर, श्रीनिवास बढे, राजू नागणे, संतोष बागडी, जवाहर ढोरे, बळीराम जाधव,धुरपे दादा, अप्पा पाटील, शशिकांत दुधारे, डॉ.प्रदिप ननावरे, राहुल जवळकर, सखाराम रेडेकर, श्रीकांत पवार, संतोष ढोरे, माऊली जगताप, संतोष लहाने, हिरेन सोनवणे, सुभाष दादा काटे, जाधव अंकल, संदीप दरेकर, अमोल तावरे, साई कोंढरे, ललित म्हसेकर, पत्रकार संगीता पाचंगे स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

Google Ad

सायंकाळी ७.३० वा. पी डब्लू डी मैदान नवी सांगवी येथे फायर शो या फटाक्यांची आतषबाजी करत, ढोलच्या गजरात दिव्यांच्या झगमगाटात या स्पर्धेला प्रारंभ झाला, व पहिल्या समन्याची सुरुवात झाली. लोकनेते आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यावर्षीही दि. ०८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शहरातील नामांकित क्रिकेट संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ चषक स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात येणार आहेत. यावर्षी स्पर्धा डे नाईट असल्याने रंगत येणार हे नक्की, तेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे.

रमेश गाढवे यांचा संघ या स्पर्धेत विजयी झाल्यास त्यांच्या वतीने संघास अयोध्या श्रीराम दर्शन घडणार आहे, यावेळी क्रिकेट सामन्यास विजूशेठ जगताप यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in  अजय दुधभाते, दिपक मंडले सर, प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे, त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला. यावेळी शंकरभाऊ जगताप यांनीही उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. या आयोजनात अजय दुधभाते, निलेश जगताप, मनीष कुलकर्णी तसेच प्रवीण वाघमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.

Live सामना पहा, ‘शंकरभाऊ जगताप’ यांच्या उपस्थितीत :-

आजची काही क्षणचित्रे :-

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!