Google Ad
Uncategorized

रविवारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पञकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० नोव्हेंबर २०२३) : ३ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पञकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता, या शिबिराचे उद्घाटन परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लोकमान्य कॅन्सर केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल क्षीरसागर, डाॅ. सहदेव गोळे व तज्ञ महिला डाॅ. मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. याचा सर्व पत्रकार बंधू, भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले आहे.

Google Ad

लोकमान्य हॉस्पिटल, कॅन्सर विभाग बिल्डिंग, चिंचवड रेल्वे पुलाशेजारी, चिंचवड येथे होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या व्याधीवर आयुर्वेद तपासणी आणि जनरल तपासणी यामधे BP /BMI /BSL-R / Height and weight / Pulse / ECG, महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची पुर्व तपासणी ( IBE & CBE ) तसेच आधुनिक तंत्रज्ञान द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी महिला तज्ञ डॉक्टर करतील आणि वेदना रहित तपासणी होणार आहे.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व सदस्य व शहरातील दैनिक, साप्ताहिक, ऑनलाईन चॅनेलच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असेही आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले आहे.

———————————–

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!