Categories: Editor Choice

पुण्यात ऑनलाइनरित्या महिलांकडून मैत्रीचा बहाणा … रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेलिंगद्वारे एक्सटोर्शन, दोघा तरुणांच्या आत्महत्येने खळबळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑक्टोबर) : सोशल मीडियावरील अनोळखी फ्रेण्डशीपमुळे तरुणांपासून ते जेष्ठ नागरिकांना सायबर चोरटयांकडून हनी ट्रॅपमध्ये अडकविले जात आहे. ऑनलाइनरित्या महिलांकडून मैत्रीचा बहाणा करून सेमी न्यूड कॉल (अर्धनग्न ) करीत रेकॉर्डिंगद्वारे ब्लॅकमेलिंगद्वारे एक्सटोर्शन केले जात आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे.

त्याच धमक्यांच्या भीतीने सहकारनगर आणि दत्तवाडी परिसरात दोघा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून पुण्यात वर्षभरात तब्बल 1400 जणांना अशाच पद्धतीने लुटण्यात डाव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनो कोणत्याही सोशल मीडियावर आभासी मैत्री करण्यापुर्वी दक्षता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून नागरिकांचा विश्वास संपादित केला जाते. त्यानंतर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून सायबर चोरटयांकडून मेसेजद्वारे चॅटिंग करून मोबाईल क्रमाकांची देवाण-घेवाण केली जाते. त्यानंतर महिलेचा फोटो असलेल्या चोरट्यांकडून न्यूड (नग्न होउन) कॉल करून संवाद साधला जाते. नेमकी तीच संधी साधून सायबर चोरट्यांकडून स्क्रीन रेकॉर्डींग केले जाते. रेकॉर्डेड व्हिडिओ संबंधिताला तपाठवून पैशांची मागणी केली जाते. त्याने पैसे न दिल्यास रेकॉर्डडेड व्हिडीओ फेसबूक व युट्युबवर व्हायरल करण्याची धमकी देउन खंडणी उकळली जाते.सोशल मीडियावर आधी ओळख मग सेक्स चॅट आणि त्यानंतर न्यूड व्हिडीओ कॉल करून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्यामुळे तरुणांची मानसिकता ढासळली जात आहे. एकीकडे कुटूंब, नातेवाईक, नोकरीच्या ठिकाणी बदनामी टाळण्यासाठी अनेकांकडून तक्रार देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सायबर चोरटयांचे फावले आहे. अशाच दोन घटनेत सायबर चोरटयांनी सहकारनगर आणि दत्तवाडी परिसरातील तरुणांचे अर्धनग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर त्यांना वेळोवेळी फोन करून रक्कम मागत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीला घाबरून दोघांनी एकाच आठवडयात आत्महत्या केल्या आहेत.

सेक्सटोर्शनद्वारे सुशिक्षित नागरिक सर्वाधिक फसवणूकीचे बळी ठरत आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये 18 ते 35 वयोगटातील तब्बल 682 जणांना लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. तर 2022 मध्येही अशाच पद्धतीने 1400 जणांचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सेक्सटोर्शनपासून एक्सटोर्शन (खंडणी) पर्यंतच्या डावामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ व्हायरल होऊ नये या भीतीपोटी 2 हजारांपासून एक लाखांवर ऑनलाईन रक्कम सायबर चोरट्यांनी स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करून घेतली आहे. जाळ्यात अडकविल्यानंतरही सायबर चोरट्यांकडून वारंवार पैशांची मागणी केल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अनोखळी आभासी महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट घातक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्षभरात पुण्यात 1400 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी असून चौकशी सुरू असल्याची माहिती सायबर विभाग पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी दिली आहे.

हनी ट्रॅपपासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्या

सोशल मीडियावर अनोळखी महिलेकडून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. त्यानंतर ओळख वाढवून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक शेयर केले जातात. त्याद्वारे चॅटिंगनंतर संबंधित मैत्रिण फेक अश्लील व्हिडीओ पाठवून तरूणाला सेमी न्यूड (अर्धनग्न )होण्यास भाग पाडते. भावनेच्या आहारी संबंधित कॉलर न्यूड झाल्यानंतर त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग सायबर चोरटे करतात. तो व्हिडीओ फेसबुक, युटयूब , इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली जाते. अशा लुटमारीपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी अनोळखी मैत्रीपासून दूर राहाण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

17 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago