Google Ad
Uncategorized

नवी-सांगवी मधील साप्ताहिक क्रांती समाचार चे संपादक-निर्भीड पत्रकार ‘रमाकांत आरेकर’ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : नवी सांगवीतील साप्ताहिक क्रांती समाचार चे मुख्य संपादक निर्भीड पत्रकार रमाकांत तुकाराम आरेकर यांचे आज (दि.२४ नोव्हेंबर) रोजी वयाचे ५६ वर्षी व्या हृदयविकाराच्या झटक्याने सायंकाळी ०७.३० वाजता च्या दरम्यान दुःखद निधन झाले. रमाकांत हे मनमिळाऊ स्वभावाचे व हसतमुख व्यक्तीमत्व होते. तसेच उत्कृष्ट वक्ता आणि निर्भीड पत्रकार म्हणून ते परिचित होते. रमाकांत यांचे मृत्यू पश्चात पत्नी ,दोन मुले ,आई- वडील, भाऊ,व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

विशेष म्हणजे आजच रमाकांत यांचा ५६ वा वाढदिवस होता, त्याच दिवशी नियतीने त्यांच्यावर असा डाव केल्याने त्यांच्या मित्र परिवारात आणि नातेवाईकांत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी सांगवीत माणुसकी आणि मदतीचे माहेरघर म्हणजेच आरेकर कुटुंबीय अशी त्यांची वेगळी ओळख होती. रमाकांत हे मनमिळाऊ आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा मित्र परिवार सांगवी पिंपळे गुरव तसेच पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Google Ad

कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून रमाकांत यांची परिसरात ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही ईश्वर चरणी प्रार्थना!

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!