Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड च्या ‘डॉ.अंजली संदीप आवटे’ ठरल्या … मिसेस इंडिया प्राईड 2022 च्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : मिसेस इंडिया प्राईड 2022 ” ( Mrs India Pride 2022 ) ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीचा पुणे येथे पार पडली . देशभरातील विविध सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता . अंतिम पंधरा स्पर्धकांमधून डॉ . अंजली संदीप आवटे यांनी प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.

डॉ . अंजली आवटे यांचा जन्म सातारा येथे झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब व राजस्थान येथे झाले, त्यानंतरचे शिक्षण त्यांनी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पूर्ण केले . गेली पंधरा वर्षे त्या एक उत्तम आयुर्वेद चिकित्सक म्हणून रुग्णसेवेत आहेत .

चिंचवड येथील कृष्णानगर मध्ये त्यांचे Dr Anjali’s – Rejuvna ) डॉ अंजलीन रिज्युवना- स्किन , हेअर , ओबेसिटी , गायिनीक क्लिनिक , या नावाने दवाखाना असून तिथे त्या सौंदर्य चिकित्सक त्या व लेझर उपचार ( Cosmetologist and Torchelogist ) तज्ञ तसेच आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम पाहतात.

कुटुंब व मुलांना प्राधान्य देत , स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी अशा प्रकारच्या विजेतेपद मिळवण्याचे लहानपणीचे स्वप्न आज “मिसेस इंडिया प्राईड 2022 ” ( Mrs India Pride 2022 ) हा बहुमान मिळवत पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आई वडीलांना , तसेच त्यांच्या सर्व कुटुंबियांना फार अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.

या स्पर्धेचे आयोजन दि. १६ जुलै रोजी पुणे येथील 3D Destination येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे ternational greemes आयोजक SIPA Entertainment व J4E होते व त्यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचा कार्यभार आयोजक साहिल शहा व अपूर्वा शहा यांनी तसेच ऑफिशियल ग्रुमिंग पायल प्रामाणिक यांनी केले . प्रसिद्ध फॅशन डिझाईनर जाझ शेख खान व कल्पना दुआ यांनी परीक्षक म्हणून काम केले, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

10 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago