महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : एखाद्या सौंदर्य स्पर्धेत आपल्याला विजेतेपद मिळावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते प्रत्यक्षात उतरवून विजेतेपद मिळवणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या डॉ. अंजली संदीप आवटे यांनी “मिसेस इंडिया प्राईड 2022” या राष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेत विजेतेपदाचा मुकूट पटकवला. हा मुगुट मिळविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील त्या पहिल्या मानकरी आहेत. मिसेस इंडिया प्राईड 2022 ” ( Mrs India Pride 2022 ) ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीचा पुणे येथे पार पडली . देशभरातील विविध सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता . अंतिम पंधरा स्पर्धकांमधून डॉ . अंजली संदीप आवटे यांनी प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
डॉ . अंजली आवटे यांचा जन्म सातारा येथे झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब व राजस्थान येथे झाले, त्यानंतरचे शिक्षण त्यांनी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पूर्ण केले . गेली पंधरा वर्षे त्या एक उत्तम आयुर्वेद चिकित्सक म्हणून रुग्णसेवेत आहेत .
चिंचवड येथील कृष्णानगर मध्ये त्यांचे Dr Anjali’s – Rejuvna ) डॉ अंजली रिज्युवना- स्किन , हेअर , ओबेसिटी , गायनॅक क्लिनिक , या नावाने दवाखाना असून तिथे त्या सौंदर्य चिकित्सक लेझर उपचार ( Cosmetologist and Trichologist ) तज्ञ तसेच आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम पाहतात.
या स्पर्धेचे आयोजन दि. १६ जुलै रोजी पुणे येथील 3D Destination येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजक SIPA Entertainment व J4E होते व त्यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचा कार्यभार आयोजक साहिल शहा व अपूर्वा शहा यांनी तसेच ऑफिशियल ग्रुमिंग पायल प्रामाणिक यांनी केले . प्रसिद्ध फॅशन डिझाईनर जाझ शेख खान व कल्पना दुआ यांनी परीक्षक म्हणून काम केले, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…