Categories: Editor Choice

सौ.सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी केले शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी दीपोत्सव तसेच दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ नोव्हेंबर) : माननीय आमदार लक्ष्मण जगताप, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय महापौर माई ढोरे यांच्या सहकार्याने सौ.सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी बुधवार दोन नोव्हेंबर रोजी शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी दीपोत्सव तसेच दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता.

या दीपोत्सवाचे उद्घाटन आदरणीय महापौर माई ढोरे, हिरेन सोनवणे, उमेश बोरसे , रमेश मोरे, जवाहर ढोरे, बाळू काटे, कमलाकर जाधव,संजय ढोरे,संदीप जगताप,महेश कावळे,भूषण शिंदे,संकेत लोहकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग अध्यक्ष श्री कृष्णा भंडलकर यांनी केले.आभार प्रदर्शन सौ सारिका कृष्णा भंडलकर यांनी केले. या दीपांच्या प्रकाशाने ‘शिवसृष्टी उद्यान’ परिसर झळाळून निघाला. यावेळी  स्वयंसाहाय्य बचत गटाच्या महिला सदस्य, युवती, युवक आणि बालकांनीही दीप प्रज्वलित करून या उत्साहाचा आनंद लुटला. या ठिकाणी दिवाळी फराळाचा आनंद नागरिकांनी घेतला व दिवे लावून या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निशा कुंभार, चैत्रा कुलकर्णी, मयुरा कटके, लता कांबळे, प्रतिमा आदम, साक्षी वाघमारे , निता सेहगल ,शीतल शीलवंत आदी महिलांनी प्रयत्न केले.

दीपावलीनिमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद वाढीस लागावा, यासाठी दिवाळी फराळ आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला असल्याचे सारिका भंडलकर यांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

5 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

15 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

15 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago