Categories: Editor Choice

आजपासून भाजपाचे आमदार, खासदार बिगरनिधीचे … त्यांचा निधी असणार पक्षाच्या ताब्यात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ नोव्हेंबर) : भाजपचे राज्यसभचे खासदार आणि विधान परिषदेतील आमदार यांना मिळणारा निधी आता पक्षाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. निधीचा प्राधान्यक्रम पक्षाची तीन सदस्यीय समिती ठरवेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांना त्यांचा निधी हा कुठेही खर्च करता येतो. त्यांना मतदारसंघांचे बंधन नसते. भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी काही महिन्यांपूर्वी असा निर्णय घेतला की त्यांना दरवर्षी मिळणारा पाच कोटी रुपयांचा आमदार निधी हा पक्ष सांगेल त्या ठिकाणी खर्च केला जाईल. त्यानुसार कार्यवाहीदेखील सुरू झाली. आपल्या इच्छेनुसार काही कामे सुचविण्याची मुभा आमदार खासदारांना असेल पण त्याबाबतची पण ती त्यांना पक्षाकडे करावी लागेल.

अंतिम निर्णय पक्षाचा असेल. प्रदेश कार्यालयातील बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ‘तुमचा निधी आजपासून तुमचा नाही, तुम्ही बिगरनिधीचे आमदार, खासदार आहात असे समजा’ या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत या निधीवर पक्षाचा अधिकार असेल, असे स्पष्ट केले.राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. सहा वर्षांत त्यांना तीस कोटी रुपये मिळतात. भाजप सदस्यांच्या निधीचा वापर कुठे करायचा याचा निर्णय श्रीकांत भारतीय, खा. डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती घेईल.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये हा निधी बहुतांश खर्च केला जाईल. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत थोड्या फरकाने भाजपने गमावलेल्या मतदारसंघांना विशेष प्राधान्य असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

8 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

12 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago