Categories: Editor Choiceindia

Delhi : 31 मार्चपूर्वीच करा ही महत्त्वाची 10 कामं , 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम

महाराष्ट्र 14 न्यूज :  मार्च महिन्याअखेरीस आर्थिक वर्ष (Financial Year) देखील संपते. त्यामुळे आर्थिक कामांच्या बाबतीत मार्च महिन्याला विशेष महत्त्व आहे. अशावेळी काही काम पूर्ण करण्याची डेडलाइन 31 मार्च (31st March) आहे. यामध्ये टॅक्स संदर्भातील काही महत्त्वाची कामं तुम्ही 31 मार्चपूर्वी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही डेडलाइनआधी काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने विविध स्कीम्स आणि अनेक नियमांचे पालन करण्याची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली होती. जाणून घ्या कोणत्या बाबी तुम्ही 31 मार्चपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. ITR Filing

तुम्ही आतापर्यंत आर्थिक वर्ष 2019-20 साठी रिवाइझ्ड किंवा डिलेड इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर लक्षात घ्या याकरता डेडलाइन 31 मार्च आहे. डिलेड इनकम टॅक्स रिटर्न भरल्यामुळे तुम्हीला 10000 रुपयांपर्यंतचा लेट फाइन भरावा लागेल. मात्र तुमचा इनकम 5 लाख रुपयांपर्यंत आहे तर तुम्हाला 1000 रुपये शुल्क द्यावे लागेल.

2. फायलिंग बिलेटेड

31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही आर्थिक वर्ष 2019-20 साठी सुधारित किंवा उशीरा प्राप्तिकर फाईलची शेवटची तारीख देखील असेल. आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी मूळ मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरला जातो. यासाठी करदात्यास दंड भरावा लागेल. बिलेटेड आयटीआर 10,000 रुपयांच्या दंडासह 31 मार्च 2021 पूर्वी सादर करावयाचे आहे.

3. रिवाइझ्ड रिटर्न

हा रिटर्न तेव्हा फाइल केला जातो जेव्हा करदाता मुख्य टॅक्स रिटर्न भरताना एखादी चूक करतो. यामध्ये डिडक्शचा क्लेम विसरणे, उत्पन्न किंवा बँक खात्याचा अहवाल न देणे इत्यादी चुका समाविष्ट आहेत. तुम्ही आयटीआर दाखल केला असेल, परंतु त्यामध्ये काही बदल करायचे असल्यास सुधारित रिटर्न दाखल करू शकता.

4. जीएसटी रिटर्न फायलिंग

वित्तीय वर्ष 2019-20 साठी वार्षिक जीएसटी रिटर्न (GST Return) भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 पर्यंत आहे. वित्त मंत्रालयाने करदात्यांची अडचण लक्षात घेता GSTR-9 आणि GSTR-9C दाखल करण्याची तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

5. LTC कॅश व्हाउचर स्कीम अंतर्गत बिल जमा करणे

एलटीसी कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत कराचा लाभ (Tax Benefit) घेण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. लाभ मिळविण्यासाठी करदात्यांना आवश्यक बिले 31 मार्चपर्यंत त्यांच्या संस्थेकडे सादर कराव्या लागतील. बिलात जीएसटी रक्कम आणि विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे.

6. PAN आणि आधार कार्ड लिकिंग

सध्या नियमांनुसार पॅन आपल्या आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे. ज्याची अंतिम मुदत 30 जून 2020 वरून 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी अद्याप आपला पॅन क्रमांक आधारशी जोडला नाही त्यांना दंड भरावा लागेल. या व्यतिरिक्त त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2021 पासून निष्क्रिय होईल.

7. स्पेशल फेस्टिव्ह अॅडव्हान्स स्कीम

सरकारी कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत बिनव्याजी 10000 रुपयांपर्यंतचा विशेष अॅडव्हान्स मिळवू शकतात. एलटीसी कॅश व्हाउचरसमवेत सरकारने या स्कीमची घोषणा 2020 मध्ये केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांनी जर ही आगाऊ रक्कम घेतली तर ती ते जास्तीत जास्त 10 हप्त्यांमध्ये फेडू शकतात.

8. इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम

सरकारने आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत 13 मे 2020 रोजी इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (Emergency Credit Line Guarantee) ची घोषणा केली होती. या स्कीमअंतर्गत बिझनेससाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या स्कीमचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.

9. या बँकांचे जुने चेकबुक 31 मार्चपर्यंत वैध

देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक आणि अइलाहाबाद बँक या बँकांचे जुने चेकबुक 31 मार्चपर्यंत वैध आहेत. अन्य बँकांमध्ये हा बँकांचे विलिनीकरण झाल्याने 1 एप्रिलपासून हे चेकबुक अवैध ठरतील. त्यामुळे तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल, तर लवकरत तुमच्या बँकेत जाऊन यासंबंधी विचारणा करा.

10. PMAY क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत क्रेडिट सबसिडीचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. याअंतर्गत गृहकर्जावर क्रेडिट लिंक सबसिडी मिळते. 6 लाखापासून ते 18 लाखापर्यंत उत्पन्न असणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 hours ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

3 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

3 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

4 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 days ago