Google Ad
Uncategorized

दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आणखी 5 मोठे निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑक्टोबर) : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 03 ऑक्टोबर) मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी देखील राज्य सरकारने दिवाळीला नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा आनंदाचा शिधा देताना त्यात मैदा आणि पोहे यांचाही समावेश असणार आहे, त्यामुळे सामन्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.

Google Ad

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात;

  1. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
  2. विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
  3. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
  4. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. 45 पदांनाही मंजुरी.
  5. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा.
  • गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना 90 टक्के शासन अनुदान.

सोयाबिन पिकाबाबत महत्वाचे निर्देश : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

अजित पवार बैठकीला अनुपस्थित :

राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक ही राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीविना पार पडली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी अजित पवार यांची तब्येत ठिक नसल्याचे सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!