Categories: Uncategorized

यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांची आकुर्डी येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांनी आज भेट दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी या नाट्यगृहाची विस्तृत माहिती त्यांना दिली.

           यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे,बाळासाहेब गलबले, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे उपस्थित होते.

          यशदाच्या वतीने ताथवडे येथे सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे प्रयोजन आहे, असे भवन उभारताना इतर सांकृतिक भवनांची माहिती घेऊन परिपूर्ण सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे विचारधीन असल्याचे  एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. महानगरपालिकेने वेगळ्या प्रकारे अत्याधुनिक नाट्यगृह उभारले असून यांमुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून शहरात प्रगल्भ रसिक श्रोते निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांचेसमवेत यशदाचे भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख राज ठाणगे, स्थापत्य अभियंता रवींद्र आव्हाड, वसतीगृह व्यवस्थापक अजय दिवटे, समन्वयक शितल कचरे शिष्टमंडळात सहभागी होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे सर्व आत्याधुनिक सोयी सुविधायुक्त नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये नाट्यगृहाच्या तीन मजली मुख्य इमारती अंतर्गत तळमजल्यावर कलादालन व कॅफेटेरियाचा समावेश आहे.पहिल्या मजल्यावर प्रशस्त लॉबी पॅसेजव्दारे नाट्यगृहाचे मुख्य प्रवेशव्दाराचा अंतर्भाव आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीसाठी स्वतंत्र प्रवेशव्दार असुन इमारतींतर्गत कॉन्फरन्स हॉल, मुख्य नाट्यगृहाची आसन व्यवस्था ८०० आहे. २२० आसन व्यवस्था असलेले छोटे नाट्यगृह, किचन सुविधासह उपाहारगृह इ. बाबींचा समावेश आहे. तसेच इमारतीतील चौथ्या व पाचव्या मजल्यावर १२ खोल्या तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये नाट्य कलाकार, वादक तसेच रंगमंचावर काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांचेसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नाट्यगृह इमारतीत दोन मजली तळघर असुन, त्यामध्ये १२० चारचाकी वाहने व २५० दुचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतींतर्गत आवश्यक अग्निप्रतिरोधक व्यवस्था, अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वयंचलित जनित्र व्यवस्था,दिव्यांगासाठी स्वतंत्र रॅम्पव्दारे प्रवेशाची व्यवस्था करणेत आलेली आहे. प्रत्येकी १० व्यक्तींच्या क्षमतेच्या आधुनिक चार लिफ्टच्या (उर्ध्ववाहिनी) मुख्य प्रवेश दालनांतर्गत समावेश आहे. नाट्यगृह ८००४ चौरस मीटर च्या भव्य जागेत मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आले असून बांधकामाचे क्षेत्रफळ ७७५८ चौरस मीटर एवढे असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago