Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ गार्डन ग्रुप आणि चैतन्य हास्य परिवाराच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात कार्तिक पौर्णिमा आणि गुरू नानक जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ गार्डन ग्रुप आणि चैतन्य हास्य परिवाराच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Google Ad

पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी सुरूवातीला गुरुनानक जयंती निमित्त गुरुनानक यांच्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राजमाता जिजाऊ गार्डन ग्रुपचे सदस्य तसेच नवचैतन्य परिवाराचे सर्व सदस्य आणि पिंपळे गुरव परिसरातील अनेक नागरिकांनी 2100 दिवे लावून दीपोत्सवाचा आनंद साजरी केला .

प्रास्ताविक प्रा . उमेश बोरसे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड . प्रताप साबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुन्नाभाई शेख श्री . प्रसाद जाधव , श्री तोडकर काका , श्री संदीप जाधव , नरेश , सिताराम भाई , श्री . सुभाष खुडे राजेंद्र अरूडे , प्रवीण जाधव , राहुल खुटाळे , गुरू शेट्टी पाटील , गायकवाड , शिंदे , सूर्यनमस्कार ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते , तसेच नवचैतन्य हास्य ग्रुपच्या अनेक ज्येष्ठ बंधू भगिनींनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!