Categories: Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त … ‘उन्नती सोशल फाऊंडेशन’च्या वतीने रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जुलै) : कार्य कोणतेही असो त्या माध्यमातून उन्नतीने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. संकटकाळात समाजाप्रती जबाबदारीचे भान राखून तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाणारा उन्नतीचा सदस्य भाजपाच्या प्रत्येक कार्यात योगदान देत आला आहे. पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी म्हणून मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे रोपांचे वाटप करुन नागरिकांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज पेरणे गरजेचे आहे, अशी भावना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केली.

भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे रोप वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शेकडो लोकांना यावेळी रोपांचे वाटप करण्यात आले. या परिसरात सोसायट्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यासाठी वाव मिळत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळून मृत पावलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, पि के स्कुल चे संस्थापक जग्गनाथ अप्पा काटे,ऑल सिटिझन असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, शंकर चोंधे,श्रीकृष्ण निलेगावकर, रमेश वानी आनंद हास्य क्लब आदी उपस्थित होते.

सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्रदुषण वाढत असून मानवी आरोग्याला घातक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज बनली आहे. झाडे लावली पाहिजेत. त्याचे संगोपन केले पाहिजे. तरच, आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळू शकतो”.

उन्नतीच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली. शेकडो रोपांची लागवड देखील केली. आज उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरण विषयक सकारात्मक बीज रोपन करण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायटीधारकांना रोपांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या रोपांचे चांगल्या ठिकाणी रोपन करुन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन भिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद हास्य क्लब चे अध्यक्ष राजेंद्रनाथ जसवाल यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago