Categories: Editor Choiceindia

Delhi : यंदाच्या बजेटमध्ये नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकार खास गिफ्ट देण्याच्या तयारीत … शेतकऱ्यांना समोर ठेवून अनेक योजनांवर काम सुरू!

महाराष्ट्र 14 न्यूज : महापूर, कोरोना, लॉकडाऊन अवकाळी पाऊस, चक्रीवादळ एकामागून एक येणाऱ्या अनेक संकटातून बळीराजा सावरत आहे. नव्या आर्थिक वर्षात दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तर दुसरीकडे कोणत्या योजना आणि नव्या सुविधा मिळणार याकडे लक्ष आहे. यंदाच्या बजेटमध्ये नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकार खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना समोर ठेवून अनेक योजनांवर काम सुरू आहे.

नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार दोन मोठ्या योजना आणण्याच्या तयारीत आहे. एक तर पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील निधीमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करणं. दुसरं कृषी कर्जातील रकमेत वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

मो

दी सरकार कृषी कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य वाढवले जातं, परंतु यावेळी कृषी कायद्याच्या विरोधात देशात तयार झालेल्या वातावरणामुळे मोदी सरकार त्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

सरकार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जात 19 लाख कोटी रुपयांची वाढ करू शकते. आकडेवारीनुसार ही वाढ सुमारे 25 टक्क्यांपर्यंत असू शकते. जर असं झालं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारचं एक मोठं पाऊल मानलं जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

साधारणपणे, कृषी कर्जे 9 टक्के व्याज दराने शेतकर्‍यांना दिलं जातं. शेतकऱ्यांना खास सवलतीत सरकार सुविधा उपलब्ध करून देत असते. सरकार 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जात 2 टक्के अनुदान देते. यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 7 टक्के दराने कर्ज दिलं जातं. जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना 3% सवलती मिळतात. सरकार अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन देत असतं.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

7 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 day ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

2 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

5 days ago