Google Ad
Uncategorized

शाळेत मुलांची हजेरी आवश्यक आहे की नाही हा निर्णय राज्यांचा : केंद्र सरकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२फेब्रुवारी) : देशात कोरोना संसर्गाची घटती आकडेवारी पाहता अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सूचना केल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना वर्गांना उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे का? हे ठरवण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. कोरोनाच्या तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशाच्या विविध भागात शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यमान शाळेच्या कोरोना नियमावलीमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये आणि नंतर 2021 वर्षी फेब्रुवारीमध्ये जारी केलेली शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीची सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्येही जोडण्यास सांगितली आहेत. “विद्यार्थ्यांच्या शाळांमधील वर्गातील उपस्थितीबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे” असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Google Ad

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ब्रिज कोर्स तयार करून अतिरिक्त लक्ष देण्याची गरज असलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या पलीकडे पुस्तके वाचली जातील याची खात्री करून आणि उपचारात्मक कार्यक्रम राबवून ऑनलाईन ते वर्गातील शिक्षणाकडे सुरळीतपणे वळवण्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!