Categories: Editor Choice

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा १०% रक्कम भरण्यासाठी दि.१५/१२/२०२१ ते दि.१५/०१/२०२२ दरम्यानची मुदत

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ डिसेंबर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा १०% रक्कम भरण्यासाठी दि.१५/१२/२०२१ ते दि.१५/०१/२०२२ दरम्यानची मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पा मध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला १०% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात दि.१५/१२/२०२१ पासून येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन मा.महापौर उषा उर्फ माई ढोरे व मा.आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सदर योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी एकुण ३६६४ सदनिका बांधण्यात येते आहे. त्या पैकी बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ व चऱ्होली येथे १४४२ असे सदनिका वाटप करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

https://www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांचे नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुलन,भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे – ३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

2 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

3 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

4 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

6 days ago