Categories: Editor ChoiceSports

पंजाबने सर्वप्रथण हॉकी उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मान मिळविला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ डिसेंबर) :  पहिल्या फेरीत दणदणीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या जम्मू-काश्मिर आणि राजस्थान संघांनी आज ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद करत स्पर्धेतील आपले आव्हान राखले. त्याचवेळी ड गटातून दुसऱ्या विजयाची नोंद करून पंजाबने सर्वप्रथण उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मान मिळविला.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत आज सी गटात जम्मू-काश्मिर संघाने अरुणाचल प्रदेश संघाचा १०-३ असा परा.भव केला. पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मिरला कर्नाटकाकडून १४ गोलने मात खावी लागली होती. आज त्यांनी संयमाने खेळ करताना स्पर्धेत आव्हान राखले जाईल याची काळजी घेतली. सामन्याच्या १३व्या मिनिटाला जसप्रितने त्यांचे खाते उघडले. त्यानंर त्याने संपूर्ण सामन्यात हॅटट्रिकसह चार गोल केले. पूर्वार्धात उचा सिंग आणि संदीप यांनी एकेक गोल करत अरुणाचल प्रदेशलाही संधी निर्माण करून दिली होती. तरी विश्रांतीला ते याचा फायदा उठवू शकले नाही. त्यांना विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा २-५ असे पिछाडीव रहावे लागले.

बाजू बदलल्यानंतर उत्तरार्धाची सुरवात वेगवान झाली. जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश संघांनी एकाच मिनिटात एकमेकांवर गोल करत चुरस निर्माण केली होती. मात्र, त्यांना नंतर जम्मू काश्मिरच्या आक्रमणांना रोखता आले नाही. त्यानंतर जम्मू-काश्मिर संघाने आणखी चार गोल करत मोठा विजय साकार केला. त्यांच्या जसप्रीतला करणजीत, मनप्रीतने दोन गोल करत साथ केली. संदीप सिंग, हुसेन महंमद दर यांनी एकेक गोल केला.

पहिल्या सामन्यात चंडिगडकडून १४ गोलने मात खाणाऱ्या राजस्थानने आज त्रिपुरावर १८ गोलने विजय मिळविला. विजेंद्र सिंग याने सहा गोल करताना विजयात महत्वाचा वाटा उचलला. शामसिंगने ४, तर हशनप्रीत, करणज्योतनो प्रत्येकी दोन गोल केले. अख्तर कुरेशी, चेतन कालोट आणि अमित कुमार यांनी एकेक गोल नोंदवला.

पंजाबने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आंध्र प्रदेशाचा ७-१ असा पराभव केला. अंदमान-निकोबारच्या माघारीमुळे या गटात तीनच संघ खेळणार असल्याने पंजाबने दुसरा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पंजाब पहिला संघ ठरला.

निकाल –

गट सी – कर्नाटक ४ (हरिष मुटागर ५वे, एस. दिक्षीत २५वे, शामंथ सी.एस. ४०वे, पवन मादीवलार) वि.वि. पुड्डुचेरी ० मध्यंतर २-०
जम्मू-काश्मीर १० ( जसप्रित सिंग १३वे, १९वे, ३३वे, ४४वे मिनिट, करणजीत सिंग १६वे, २६ने मिनिट, संदीप सिंग २१वे मिनिट, मनप्रीत सिंग ४२, ५९वे मिनिट, हुसेन महंमद दर ५६वे मिनिट) वि.वि. हॉकी अरुणाचल ३ (उचा सिंग २२वे, संदीप ३०, ३३ वे मिनिट) मध्यंतर ५-२

गट ड – हॉकी पंजाब ७(रुपिंदर पाल सिंग २रे, लोवप्रित जनिथ ५वे, रणजीत सिंग १९वे, सुदर्शन सिंग २९वे, ५५वे, परमजीत सिंग ४०वे, संकल्प सिंग ४२वे) वि.वि. आंध्र प्रदेश १ (वेंकटा श्री अर्जीपिनेनी बालाजी २६वे मिनिट)
हॉकी उत्तराखंड पुढे चाल वि. अंदमान -निकोबार ५-०

गट ई – हॉकी चंडिगड १ (अमनदीप ४२वे मिनिट) वि.वि. मणिपूर ०, मध्यंतर ०-०
राजस्थान १८ (हशनप्रीत सिंग १२वे, ४५वे, शाम सिंग १४वे, ५२वे, ५३वे, ५८वे, करणज्योत सिंग १६, ४४वे मिनिट, चंद्रांश शर्मा ३४वे मिनिट, विजेंद्र सिंग २५, २८, ४०, ४८, ५०, ५७ वे मिनिट, अख्तर कुरेशी ३९वे, चेतन कालोट ४३वे, अमित कुमार सैनी ५९वे मिनिट) वि.वि. त्रिपुरा ० मध्यंतर ५-०

गट ब – दिल्ली ३ (धीरज वॅटस २९वे, अल्ताफ ४८वे, ब्रज गोपाळ ६०वे मिनिट) वि.वि. हॉकी मध्य प्रदेश २ (रवी राजभार १३वे, आयुष पेठे ५८वे मिनिट) मध्यंतर १-१

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

12 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago