सांगावीतील पीडब्लूडी मैदानात उभ्या असलेल्या स्कूल बसवर संकटात संकट … बसला लागली अचानक आग!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जुलै२०२१) : संकटात असलेल्या स्कूल बस चालकांना शासन तुटपुंजी मदत जाहीर करतंय अशाच कोरोना संकटामुळे गेले दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने दररोज रस्त्यावर फिरणाऱ्या स्कूल बस मिळेल त्या ठिकाणी पार्क करून बस चालकांनी इतर व्यवसाय निवडला, त्यामुळे आपल्या बसकडे पाहायला ही त्यांना वेळ नाही आणि नकोही वाटायला लागले आहे.

अशातच नवी सांगवी परिसरातील स्कुल बस बसचालकांनी पिडब्ल्यूडी मैदानाच्या हद्दीत एका बाजूला आपल्या बस लावल्या आहेत. यातीलच बसला दुपारी चार वाजता अचानक आग लागली. लॉक डाउनमुळे सर्वच सर्व खाजगी व शासकीय शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज बंद असून या शाळा व कॉलेजला विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी या बसचा वापर करण्यात येत असे, परंतु शाळा- कॉलेज बंद करण्यात आल्याने दीड वर्षांपासून बस जागेवर उभ्या असून त्यातील काही बस सांगवी येथील पिडब्ल्यूडी मैदानात असणाऱ्या स्टेजच्या एका बाजूला उभ्या करण्यात आल्या . यातील काही बसची उनाड टारगट मुलांनी तोडफोड केल्या आहेत, तर काही बसची  एकाच ठिकाणी पडून असल्याने दुरवस्था झाली आहे. यातीलच एका स्कूल बसला दुपारी चार वाजता अचानक आग लागली. आग कशी व कोणी लावली याचे कारण समजू शकले नाही.

यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलास फोन केला. हाकेच्या अंतरावर समोरच सांगवी पोलीस स्टेशन असल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर काही वेळातच अग्निशमन दल आल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी नेहमीच संकटात मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल कोंढरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुरेश सकट व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची मदत केल्याचे दिसून आले.

 

 

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago