महाराष्ट्र 14 न्यूज, (दि, २०मे) : आदर्श उद्योजक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे माध्यमातून YLTP कोर्स मधून १० हजार युवक घडवणारे आणि या साठी आधुनिक सुविधा असणारी आपली ३० हजार स्केवर फूट वास्तू आर्ट ऑफ लिव्हिंग साठी उपयोगात आणणारे मुंबई येथे व्यवसाय निमित्ताने स्थायिक असताना देखील शनिवार, रविवार या कार्यासाठी पूर्ण वेळ देऊन निधी देणारे सामजिक भान जपणारे मा. भरतशेठ भोर आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई या दांपत्याने ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या किर्तन सेवेत भरतशेठ यांचे वडील वै. तुकाराम महाराज विष्णू भोर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी १ लाख ११ हजार १११ रुपये मानधन देणगी दिला. या साठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी YLTP चे महाराष्ट्रातून आलेले तरुण तरुणी यांनी रात्री ११ वाजता मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले ज्याने डॉ. पंकज महाराज गावडे हे भारावून गेले आणि त्यांच्या बरोबर अर्धा तास संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा किर्तन केले. या प्रसंगी डॉ. पंकज महाराज गावडे यांच्यावर प्रेम करणारे शारदा प्रबोधिनी आणि देशातील पहिल्या शारदा मातेच्या मंदिराची निर्मिती करणारे गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाणखेले, ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे सर, मार्गदर्शक मित्र संजयशेठ चव्हाण, मित्र दीपक टेंबेकर, शिरीष जी हिंगे पाटील, आनंदराव शिंदे सहित असंख्य मान्यवर उपस्थित होते. किर्तन साथ करण्यासाठी गायनाचार्य प्रविण महाराज सोळंके, मृदंगाचार्य व्यंकटेश आबा फड महाराज, गायनाचार्य लक्ष्मण महाराज मिटे, माऊली महाराज, राजाराम महाराज आणि जोग संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. पंकज महाराज गावडे म्हणाले की, “भरत शेठ आपले कार्य पाहून मला खूप अभिमान वाटला की आपल्या सारखी माणसं राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आपली संपती मोकळ्या अंतकरणाने खर्च करत आहात. जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या कृपेने पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की बाबा जेथे असतील त्यांना अधिक उर्ध्वगती तुमच्या पुण्य कर्मामुळे प्राप्त व्हावी आणि तुम्हांस उदंड आयुष्य लाभो”.
*चला बदलूया राष्ट्र घडवूया..!*
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…