पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रमाण विचारात घेता शहरातील निर्बंध राहणार जैसे थे …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . ११ जून २०२१) : कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले असून यामध्ये कोणतीही शिथीलता करण्यात आलेली नाही अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली . पुण्यातील कौन्सिल हॉल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली , त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .

राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत . या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत , त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रमाण विचारात घेता शहरातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत . पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला . पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली .

मात्र पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता दिलेली नाही . पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेवूनच निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जात आहे . पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल तर निर्बंध शिथिल केले जाणार होते . मात्र पिंपरी चिंचवड शहराचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट ५.२ टक्के होता . हा रेट ५ टक्क्यांपेक्षा थोडासा जास्त असल्याने निबंध आणखी शिथिल केले नाहीत अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली .

शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी राज्यशासनाच्या आदेशानुसार पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेऊन शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले . दरम्यान शहरात सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल नाही असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले व तसे लेखी आदेशदेखील निर्गमित करण्यात आले आहे . नागरिकांनी कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे , असे आवाहनही त्यांनी केले .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

23 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago