Categories: Editor ChoicePune

अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवत म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जून) : पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचं काम अगदी छा-छू झालं आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचं काय, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला.

त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

दरम्यान, अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago