Google Ad
Uncategorized

कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी सुरवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे.

तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसत.

Google Ad

बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!