Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे खूनप्रकरणी गुन्हा, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या केल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी केला आहे.

किशोर आवारे यांचा तळेगाव दाभाडे येथे गोळीबार करत कोयत्याने वार करून शुक्रवारी दुपारी खून झाला. याबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आणि किशोर यांच्या आई सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर हा जनसेवा विकास सेवा समितीचा संस्थापक अध्यक्ष म्हणुन तळेगाव दाभाडे येथे सामाजिक काम करत होता. जनसेवा विकास सेवा आघाडी या पॅनेलमधुन तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रिय होता. त्यामुळे त्याचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनिल शेळके, सुधाकर शेळके संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच वाद होत अस.

Google Ad

सहा महीन्यापासुन किशोर हा नेहमी मला आमदार सुनिल शेळके,त्याचा भाउ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासुन त्याच्या जिवाला धोका असल्याबाबत सांगत असे असेही त्यांनी म्हटले आहे.

किशोर हा त्याचा मित्र संतोष शेळके याच्या सोबत फिरत असे ही गोष्ट सुनिल शेळके व सुधाकर शेळके यांना अवडत नसे. कारण सुनिल शेळके यांचे संतोष शेळके सोबत राजकीय वितुष्ट होते. किशोर हा संतोष शेळके यास नेहमी मदत करत असे म्हणुन सुनिल शेळके व सुधाकर शेळके हे किशोर वर नेहमी चिडुन अस. संतोष शेळके यांनी त्यांच्या विरोधात एन.सी दाखल केली होती. किशोर याने स्वतःचा असा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके याला गेल्या २ वर्षापासुन पुर्णपणे राजकीय विरोध करत होता.

किशोर याने सुनिल शेळके व त्याचे कार्यकर्ते यांनी केलेल्या चुकीच्या कामाच्या विरोधात वेळोवेळी निदर्शने केली होती. सोशल मिडीयावरही ही बाब टाकली होती. त्याचा राग आ शेळके याच्या मनात होता. किशोर आवारे याचे राजकीय वर्चस्व निर्माण होवुन सुनिल शेळके व सुधाकर शेळके यांच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे त्याने मला प्रत्यक्षपणे सांगीतले होते, असे सुलोचना आवारे यांनी सांगितले आहे.

किशोर तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गेला असता तेथे त्याला श्याम निगडकर ( रा. तळेगाव दाभाडे ,)व त्याचा तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळया झाडुन व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गंभीर वार करून जखमी केले, असे सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!