Google Ad
Uncategorized

स्वच्छ सर्वेक्षण अभियान – २०२१ : पिं.चिं.मनपा. दिघी ते गेट वे ऑफ इंडीया मुंबई पर्यावरण पूरक सायकल रॅली पूर्ण ..!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६नोव्हेंबर) : पर्यावरण पूरक स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून झाडे लावा , झाडे जगवा , पाणी आडवा , पाणी जिरवा , सायकल चालवा , इंधन वाचवा, आपली मुलगी सुरक्षित मुलगी आदी पर्यावरण निसर्गसंवर्धन जनजागृती व शरीर यष्टी साठी सायकल किती महत्त्वाची आहे या बाबत सायकल रॅलीतून जनजागृती करत तब्बल 176 कि.मी.चा यशस्वी सायकल प्रवास पूर्ण करण्यात आला.

या राॅली मध्ये माॅविक सायकल क्लबचे सायकल पटू दत्ता घुले , मयूर पिंगळे , निखिल बाबळे , तुषार वैरागे , प्रतिक जेले , प्रसाद वांगेकर , चंद्रकांत भिसे , सौरभ खोत , नचिकेत सहाणे , देवेंद्र सावंत आदी एकुण 10 सायकलपटू सहभागी झाले होते.

Google Ad

या पर्यावरण पूरक राॅलीला दिघीतून ठिक साध्या 7 वा सुरुवात झाली तर पुढे मुंबई गेट आॅफ इंडियाला पहाटे 5: 30 वाजता सायकल राॅली पूर्ण झाली .

या वेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने फिनीशअर सायकल पटूनां मिडल्स व प्रमाणपत्रक देण्यात आले .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!