Google Ad
Uncategorized

एसबीआय सोलर पॅनल बसवण्यासाठी देणार कर्ज, किती कर्ज मिळणार, अनुदान किती मिळणार ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : केंद्र शासनाने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी देशभरातील नागरिकांसाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली. या अंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता केंद्र सरकार अनुदान उपलब्ध करून देणार आहे.

यासाठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान सर्वसामान्यांना उपलब्ध होणार असून यामुळे त्यांना सोलर पॅनल बसवताना मोठी मदत होणार आहे. खरे तर अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्य संकटात आले आहेत.

Google Ad

यामुळे अनेक जण सोलर पॅनलचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र सोलर पॅनल बसवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च प्रत्येकाला झेपवणारा नाहीये. यामुळे 22 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री क्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली.

पुढे याच योजनेचे नामकरण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे करण्यात आले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे मात्र उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते. तसेच आधी लाभार्थ्याला सोलर पॅनल इन्स्टॉल करावे लागते.

मात्र अनेकांकडे सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी पैसे नसतात. आता मात्र नागरिकांची ही समस्या एसबीआय कडून सॉल्व होणार आहे. कारण की एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया सोलर पॅनल साठी कर्ज पुरवणार आहे. एसबीआय कडून सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे.

म्हणजेच एसबीआयकडून कर्ज घेऊन सोलर पॅनल इंस्टॉल करता येणार आहे तसेच यावर अनुदानाचा देखील लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोलर पॅनल साठी एसबीआय किती कर्ज मंजूर करते हे जाणून घेणार आहोत.

किती कर्ज मिळणार

3KW क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया हे सार्वजनिक क्षेत्रातील बँक 2,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करू शकते. तसेच याचा व्याज दर हा वार्षिक 7 टक्के एवढा राहणार आहे. दुसरीकडे, 3KW पेक्षा जास्त आणि 10KW पर्यंतच्या क्षमतेसाठी 6 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे.

यासाठी व्याज दर वार्षिक 10.15% एवढा राहणार आहे. विशेष बाब अशी की ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 65 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांना सुद्धा एसबीआय या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

कर्ज घेण्यासाठी किमान उत्पन्नाची अट  

एसबीआय च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या कर्जासाठी किमान उत्पन्नाची अट घालून देण्यात आली आहे. 3 kW क्षमतेपर्यंत सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु 3 kW पेक्षा जास्त आणि 10 kW पर्यंतच्या क्षमतेसाठी कर्ज मिळविण्यासाठी निव्वळ वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक राहणार आहे.

किती अनुदान मिळणार ?

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एक किलो वॅट पर्यंतची क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅटची क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी 60000 रुपये, तीन किलोवॅट तथा तीन किलो वॅटपेक्षा जास्त आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत पुरवले जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!