Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड मनपाच्या आय टी आय मोरवाडी येथे डिक्की तर्फे ‘कॅंपस कनेक्ट’ चर्चा सत्र संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी व दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १७/०७/२०२३ रोजी ‘कॅंपस कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत डिक्की नेक्सजेन तर्फे उद्योजकता विकास या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी श्रीम. मैत्रीय कांबळे, नॅशनल हेड नेक्सजेन डिक्की, श्री. अविनाश जगताप (डिक्कीचे पश्चिम विभाग प्रमुख), श्री. कृणाल जगताप, श्री. सचिन दिगोलकर व श्री. गणेश शिंदे, कोअर कमिटी मेंबर्स उपस्थित होते. श्री. अविनाश जगताप यांनी यावेळी डिक्कीची स्थापना, उद्दीष्ठे, डिक्की उद्योजकीय विषयांवर करीत असलेले कार्य याबाबत माहिती दिली. डिक्कीने घडविलेले एक उद्योजक श्री. कृणाल जगताप यांनी स्वतःचा उद्योजकीय प्रवास उलगडताना शिक्षण, नोकरी, व्यवसाय व उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

Google Ad

मुख्य वक्त्या श्रीम. मैत्रिय कांबळे यांनी कोणता ही कोणताही उद्योग हा कामातील स्किल-कौशल्यावर पारंगत असणाऱ्या तंत्र कुशल कामगारावर अवलंबून असल्याने आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांनी उद्योजकीय मानसिकता रुजूवून कामगार होण्याऐवजी स्वतः उद्योजक होण्याचे आवाहन केले. संस्थेचे प्राचार्य श्री. शशिकांत पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर श्री. जीवन ढेकळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. ओव्हाळ व श्री. रेंगडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!