Categories: Uncategorized

BREAKING NEWS : पिंपळे गुरव हत्या प्रकरण … पिंपरी परिसरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ डिसेंबर) :  पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात दिवसाढवळ्या योगेश जगताप नावाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी मुख्य आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरही आरोपींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण परिसरात गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक घडली आहे. स्व संरक्षणासाठी पोलिसांनी देखील आरोपींवर गोळीबार केला आहे. गोळीबाराच्या थरारनंतर पोलिसांनी गणेश माटेसह महेश माने आणि अश्विन चव्हाण या तिघांना जेरबंद केलं आहे.

संबंधित तिघेही योगेश जगताप यांची हत्या करून फरार झाले होते. अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवर गणेश माटे यानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago