Categories: Editor Choice

BREAKING : राज्यातील कॉलेजेस सुरू होण्याचा मुहूर्त ठरला ! ‘ या ‘ तारखेपासून सुरु होणार महाविद्यालयं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ सप्टेंबर) : राज्यात दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आज राज्यातील कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.

त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबरपशुयन राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे Breaking: MH CET परीक्षेच्या तारखांची घोषणा; ‘या’ कालावधीत होणार CET परीक्षा; लवकरच लागणार निकाल राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती दिली जाईल” असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत. लसीकरण पूर्ण होणं महत्त्वाचं कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आलं असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण झालं असणं महत्त्वाचं आहे. कोरोणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

3 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago