वाकड पोलीसांची धाडसी कामगिरी … दरोडा , जबरी चोरी , खून इत्यादी १५ गंभीर गुन्हयात अनेक वर्षापासुन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास केली अटक …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली वाकड पोलीसांनी धाडसी कामगिरी केली. दरोडा , जबरी चोरी , खून इत्यादी १५ गंभीर गुन्हयात अनेक वर्षापासुन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास वाकड पोलीसांनी पकडुन त्याचेकडुन पिंपरी चिंचवड भागातील सराफाची दुकाने , बंद घरे फोडुन त्याने केलेले ३२ घर फोडीचे व ०२ वाहन चोरीचे गुन्हे असे एकुण ३४ गुन्हे उघड करुन त्याचेकडुन एक क्विंटल चांदी ( १०० किलो ) , पाऊण किलो सोने ( ७५० ग्रॅम ) , तीन कार , एक गावठी पिस्टल , ०५ राऊंड असा एकुण किं . रु . १,११,३७,००० / – ( एक कोटी अकरा लाख सदतीस हजार रुपये ) चा मुद्देमाल हस्तगत केला.

दि . २० सप्टेंबर २०२० रोजी रात्री वाकड रोड येथील पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडुन त्यामधील सुमारे ०३ किलो चांदी व सोन्याचे दागीने चोरी झाल्याबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन त्याच रात्री निगडी येथिल नवकार ज्वेलर्स फोडुन त्यामधील २० किलो चांदीचे दागीने चोरीस गेले असल्याची माहीती मिळाली त्यानंतर अशाच प्रकारे दि . २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्रौ पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स फोडुन त्यामध्ये पाऊन किलो चांदीचे दागीने चोरीस गेल्याची घटना घडली होती . अशा प्रकारे चोरटयांनी पोलीसांसमोर आव्हान निर्माण केले होते .

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबधित पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेच्या तपास पथकांना आरोपींचा कसुन शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या अनुशंगाने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांचे नेतृत्वाखाली वाकड पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक हरिष माने व पोउनि . सिध्दनाथ बाबर यांनी दोन टीम तयार करुन त्यामार्फत तपास करीत असताना या गुन्हयांचे व निगडी येथील घटनास्थळापासुनचे सीसीटीव्ही फुटेजची विश्लेषणावरुन गुन्हयात वापरलेल्या इको कार वाहनांचा शोध घेतला असता लोणी काळभोर व लोणीकंद येथुन त्याच दरम्यान दोन इको कार चोरीस गेल्याचे तक्रारी दाखल असल्याची माहीती मिळुन आली .

त्यावरुन तपासाची सुत्रे खराडी , लोणीकंद , चंदननगर , वाघोली भागात हलवुन सदर भागातील तसेच पुणे शहर मधील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहीतगारांमार्फत तपास करता आरोपी हे सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी व त्याची टोळी असल्याबाबत दाट संशय निर्माण झाला त्याअनुशंगाने तपास करता सदरचा आरोपी हा दरोडा जबरी चोरी , खून इत्यादी गंभीर ४१ गुन्हयात अटक असलेला व त्याच प्रकारचे १५ गुन्हयामध्ये फरार असल्याची व नेहमी पत्ते बदलुन राहत असल्याची माहीती मिळुन आली तसेच तो नेहमी सशस्त्र वावरत असल्याबाबत व त्याने यापुर्वी पोलीसांवर फायरींग केली असल्याची माहीती मिळुन आली त्यामुळे त्यास पकडणे हे पोलीसांसाठी आव्हानात्मक ठरत होते .

त्याअनुषंगाने तयार केलेल्या रणनितीनुसार वाकड पोलीस स्टेशनचे सपोनि . हरिष माने , पोउनि . सिध्दनाथ बाबर तसेच तपास पथकाचे कर्मचारी यांनी खराडी , चंदननगर , वाघोली भागात १० दिवस तळ ठोकुन आरोपीबाबत माहीती घेतली असता तपास पथकाचे कर्मचारी पो . ना . प्रमोद कदम यांना माहीती मिळाली की तो एका व्हर्ना कारमधुन फिरत असल्याची माहीती मिळाली त्यावरुन सापळा लावुन त्यास सपोनि . हरिष माने , पोउनि . सिध्दनाथ बाबर तपास पथकाचे कर्मचारी विक्रम जगदाळे

विजय गंभीरे , विक्रम कुदळ , प्रमोद कदम , नितीन गेंगजे , सुरज सुतार , जावेद पठाण व इतर कर्मचारी यांनी वेरना कार नं . एमएच / ०५ / एएक्स / ९ ३७६ हिचेसह आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी वय ३१ वर्षे रा . सर्वे नं . ११० , साई बाबा मंदीरासमोर , रामटेकडी , हडपसर , पुणे यास त्याचा साथीदार विजयसिंग विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर वय १ ९ वर्षे रा . टाटा पावर हाऊस पाईपलाईन , पिसवली , कल्याण यांना मोठया शिताफीने पकडुन त्यांचे गाडीची व त्यांची पाहणी केली.

विकीसिंग कल्याणी याचेकडे एक गावठी लोखंडी पिस्टल त्यामध्ये ५ काडतुसे , व्हर्ना कारचे डिकीमध्ये दोन मोठया आकाराच्या लोखंडी कटावण्या व काळया पिशवीमध्ये दोन लोखंडी कटर त्यापैकी एक लाल रंगाची व एक निळे रंगाची एकुण ०६ मोठे स्क्रू ड्रायव्हर , एक स्प्रे चा कॅन मिळुन आले त्यामुळे त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांची १२ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला.

आरोपी यांनी त्यांचे फरार दोन साथीदार यांचेसह वाकड – ०५ गुन्हे , चिखली – ०५ गुन्हे , देहुरोड – ०३ गुन्हे , निगडी – ०६. पिंपरी -०३ , चिंचवड : ०२ , सांगवी -०२ , भोसरी ०२ , भोसरी एमआयडीसी ०२ गुन्हे , हिंजवडी ०१ , लोणी काळभोर- ०१ गुन्हा , लोणीकंद- ०१ गुन्हा , वालीव- ०१ गुन्हा असे एकुण ३४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे . तसेच आरोपी यांचेकडुन दाखल गुन्हयातील एकुण मिळुन १,११,३७,००० / रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये ७५० ग्रॅम सोन्याचे दागीने , १०० किलो चांदीचे दागीने , व्हर्ना कार , दोन इको कार , एक गावठी पिस्टल , ०५ काडतुसे , कटावण्या व गुन्हयासाठी वापरत असलेले इतर हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .

सदर आरोपी हा जबरी चोरी , दरोडा , खून , खूनाचा प्रयत्न इत्यादी ४१ गंभीर गुन्हयात पुर्वी अटकेत असुन त्याच प्रकारचे गंभीर १५ गुन्हयामध्ये तो सध्या फरार आहे . सदर उघड व फरार असलेल्या गुन्हयाची यादी सोबत जोडली आहे . सदरची कारवाई मा . श्री . कृष्ण प्रकाश साो . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . रामनाथ पोकळे साो . अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . सुधीर हिरेमठ साो , पोलीस उप आयुक्त , गुन्हे व परि -२ . पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीधर जाधव साो . सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पो . स्टे . सपोनि श्री हरिष माने , पोउनि श्री . सिद्धनाथ बाबर व तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे , जावेद पठाण , विजय गंभीरे , विक्रम कुदळ , नितीन गेंगजे , सुरज सुतार , बापुसाहेब धुमाळ , बिभीषन कन्हेरकर , बाबाजान इनामदार , शाम बाबा , नितीन ढोरजे , दिपक भोसले , सचिन नरुटे , प्रमोद भांडवलकर , प्रमोद कदम , तात्या शिंदे , प्रशांत गिलविले . नुतन कोंडे यांनी केली .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago