महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. भाजपला एकाच राज्यात कौल मिळेल आणि बाकीच्या चार राज्यांत पराभवाला सामोरे जावे लागेल, असेच चित्र सध्या दिसत आहे. हा भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशा शब्दात त्यांनी हे भाकीत वर्तवले आहे. पाच निवडणुकीच्या निकालानंतर देशात राजकीय गणिते बदलतील असा अंदाजही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. आसाम वगळता अन्य चार राज्यांत भाजपचा पराभव होईल, असाच ट्रेंड दिसत आहे.
भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, असे पवार यांनी म्हटले आहे. आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांची स्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी हे भाकीत केले. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे. बंगाली संस्कृती आणि तेथील लोकांचे मन यावर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर राज्य एकसंघ होते. आणि तशी प्रतिक्रीया व्यक्त होते, त्यामुळे येथे ममता यांचीच सत्ता येईल, हे स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.
तर केरळचा विचार केला तर येथे भाजपची सत्ता येणार नाही. केरळमध्ये डाव्यांच्या सोबत राष्ट्रवादी आहे. या ठिकाणी डाव्यांची सत्ता निश्चित निर्विवाद बहुमतात येईल.
शेतकऱ्यांना खलिस्तानवादी बोलणे हे बेजबाबदारपणे आहे, असे बोलणे हे काही लोकांचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांप्रती अशी भाषा जे करतात त्यांना महत्व का द्यायचे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी शेतकऱ्याना खलिस्तानवादी म्हटले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…