Categories: Uncategorized

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीरात , पहिल्याच दिवशी 70 हजार नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ, तर जवळपास 2 लाख नागरिकांची नावनोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेबल फौंडेशन लोकनेते आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित “अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर” कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना प्रभू श्री राम यांच्या अयोध्यातील मंदिराची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले.

सदर शिबिर ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवसीय आयोजित करण्यात आले असून PWD मैदान, नवी सांगावी पिंपरी-चिंचवड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोगाच्या निदानापासून निवरणापर्यंत रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे, यात 36 नामवंत हॉस्पिटल ने सहभाग घेतला असून, 855 डॉक्टर 236 स्टोल मधून रूग्णांना सेवा देत आहेत,  सदर शिबीरामध्ये आज महिलांची मोफत कॅन्सर तपासणी, मोफत एक्स रे, मोफत सोनोग्राफी, सर्व रक्त तपासणी या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट तसेच व्हील चेअर चे वाटप करण्यात आले, जेष्ठ नागरिकांना कानाच्या मसीनही देण्यात आल्या,  या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराला भेट देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे अवाहन आयोजक शंकर जगताप यांनी केले आहे.

या शिबिरासाठी मावळ मतदार संघाचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार श्री.महेश दादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, माजी मंत्री श्री.बाळा भेगडे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी महापौर माईताई ढोरे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ यंपल्ले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, आरएमडी जिल्हा रुग्णालय प्रमुख वंदना जोशी, यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीरात , पहिल्याच दिवशी 70 हजार नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ घरलेतला तर जवळपास 2 लाख नागरिकांची नावनोंदणी केली. आज सकाळ पासूनच नागरिकांनी ऑफलाईन नोंदणी करताना शिबिराचा लाभ घेण्यास सुरुवात केली. आज दिवसभरात जवळपास ७० हजार नागरिकांनी या शिबिरामध्ये मोफत चिकित्सा आणि उपचार करून घेतले. यापैकी ६५० नागरिकांचे एक्सरे, १९५ सोनोग्राफी, जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांची आरोग्यचिकित्सा यांचा समावेश आहे. आज पहिल्याच दिवशी सुमारे १५०० नागरिकांनी डायलेसिससाठी नोंदणी केली असून शिबिराच्या कालावधीमध्ये सुमारे ५०० नागरिकांचे डायलेसिस करण्यात येणार आहे. १० हजार ६००  रुग्णांची नेत्र तपासणी करून, ६ हजार ४५० नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तर गरजू रुग्णांना औषधे देण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago