महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ नोव्हेंबर २०२२) :- उन्नती सोशल फाउंडेशन व ऑल सिनियर सिटीजन्स असोशिएशन यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील रोज आयकॉन कमर्शिअलमध्ये रविवारी (दि. ६) रोजी सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत मोफत आयुर्वेद निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान डॉ. योगेश जोशी व डॉ. मृणालिनी जोशी यांच्या आयुष्मान आयुर्वेद हॉस्पिटलचे उदघाटन उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात मोफत अस्थी घनता (bone density) तपासणी, मोफत आयुर्वेद निदान व सल्ला, मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुर्वेद औषधे, गर्भवती महिलांसाठी पंचकर्म उपचार, महिलांसाठी घरगुती आयुर्वेद औषधी निर्माण, आयुर्वेद, पाककृती शिबिर व सवलतीच्या दरात औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. योगेश जोशी, डॉ. मृणालिनी जोशी, ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, विठाई वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल विजय भांगरे, सचिन साठे, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, सिनियर सिटीजन्स असोसिएशचे पदाधिकारी, उन्नती सोशल फाउंडेशनचे बहुसंख्य सभासद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सौ कुंदाताई भिसे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला कुठला आजार केव्हा जडेल ते सांगता येत नाही. आजार मुळासकट उपटून टाकण्यात सध्या आयुर्वेद उपचार पद्धती महत्वाची भूमिका निभावीत आहेत. शिवाय उपचाराचा खर्चही खिशाला परवडणारा असल्यामुळे नागरिकांचा आयुर्वेद उपचार पध्दतीकडे कल वाढला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…