Google Ad
Uncategorized

मातब्बरांना पराभवाची धूळ चारत अश्विनीताई बनल्या चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मार्च) : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवत अश्विनी जगताप विजयी झाल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती.अश्विनी जगताप यांनी बाजी मारत महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा 36 हजार 770 एवढ्या मतांनी पराभव केला.अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळाली.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मते मिळाली.

Google Ad

या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारात उतरले होते. दरम्यान चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान पार पडलं होतं.मात्र मविआला राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसला त्यामुळेच नाना काटे यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी देखील दिली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला पण, चिंचवडची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. परंतु, आता अश्विनी जगताप यांच्या विजयाने पुन्हा एकदा नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

‘मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे’, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!