Google Ad
Uncategorized

भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथे … लक्ष्मणभाऊ जगताप यांची कन्या सौ.ऐश्वर्या रेणुसे यांचा मतदारांशी संवाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा भाजपा आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेतील रिक्त जागेसाठी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पोटनिवडणूक होत आहे. चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांच्या रिक्त जागेवर भाजपाने त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दि.८/२/२०२३ रोजी लक्ष्मणभाऊ जगताप यांची कन्या सौ.ऐश्वर्या रेणुसे या प्रभाग क्र १८ चिंचवड येथे आल्या होत्या.

Google Ad

या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या निवास्थानी ऐश्वर्या रेणूसे यांनी भेट देऊन काकडे टाऊन शिप मधील महिला व नागरिकांशी संवाद साधून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले . या वेळी भाजपा शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ.उज्वलाताई गावडे,नगरसेविका:अश्विनीताई चिंचवडे,नगरसेवक:सुरेश भोईर, विठ्ठल भोईर,गणेश गावडे, कैलास गावडे,रंजना गावडे,नूतन चव्हाण,शुभांगी भसे आदी मान्यवर उपस्थित होते.

मधुकर बच्चे परिवाराच्या व काकडे टाऊनशीप सोसायटी वतीने सौ.रोहिणी बच्चे,वर्षा सोनार ,अपर्णा राजहंस ,सुषमा निंबाळकर, सारिका जोशी,सुप्रिया काळे,स्मिता सावंत,अश्विनी नाईक,श्रावणी बच्चे,गीता कोरे,आसावरी बच्चे ,आदींनी सोसायटीच्या वतीने सौ.ऐश्वर्याताई रेणुसे-जगताप यांचा सामुहीक सन्मान करण्यात आला. तसेच भाजपा साठी जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement